नोटबंदीच्या पन्नास दिवसांनंतरही कहीं खुशी कहीं गम

मुंबई - जुन्या नोटा, नव्या नोटा, नोटांसाठी रांगा आणि अगदी रांगांसाठी नोटा. गेल्या 50 दिवसांपासून सामान्य जनता याच गोष्टी ऐकतेय, बोलतेय आणि सहन करतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनानुसार नोटाबंदीच्या या पन्नाशीनंतर काय बदललंय, काय राहिलंय आणि काय चुकलंय हे प्रश्न विचारले जाऊ लागलेत. सामान्य मुंबईकराचं याबाबत काय म्हणणंय हे जाणून घेण्यासाठी ‘मुंबई लाईव्ह’ने पाच प्रश्न.विचारले.

परिस्थिती सुधारण्यासाठी पन्नास दिवसांची मुदत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडून मागितली होती. मात्र ‘मुंबई लाईव्ह’नं केलेल्या या रिअॅलिटी चेकमध्ये कहीं खुशी कहीं गम असंच काहीसं चित्र पहायला मिळालं.

Loading Comments