शिवस्मारक भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला

  Pali Hill
  शिवस्मारक भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला
  मुंबई  -  

  मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमीपूजन 24 डिसेंबरला होणार आहे. या स्मारकासाठी 3 हजार 600 रुपये कोटींचा अंदाजे खर्च येणार आहे. 

  आघाडी सरकारच्या काळात अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. मात्र केंद्रीय परवानग्याविना ते रखडलं होतं. मात्र भाजपाचं सरकार आल्यानंतर केंद्राकडून परवानग्या मिळाल्या. त्यानंतर आता भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.