Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही सोडणार फेसबुक, ट्विटर! 'हा' आहे त्यांचा प्लॅन

सोशल मीडिया (Social Media) सोडणार असल्याच्या चर्चांना अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्णविराम दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही सोडणार फेसबुक, ट्विटर! 'हा' आहे त्यांचा प्लॅन
SHARES

सोशल मीडिया (Social Media) सोडणार असल्याच्या चर्चांना अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्णविराम दिला आहे. सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट (Twitter) करत सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. पण अखेर मंगळवारी नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमागील खरं कारण सांगितलं आहे.


सोशल मीडिया सोडण्यामागील कारण

महिला दिनाच्या (Womens Day) पार्श्वभूमीवर ते एक दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घेणार आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, महिला दिनाच्या दिवशी आपण आपले सोशल मीडिया अकाउंट ज्या महिलांनी समाजाला प्रेरित केले आहे त्यांच्यासाठी समर्पित करत आहे. १६ तासांनंतर पंतप्रधान मोदींनी यावरून पडदा उचलला आहे. महिला दिनाच्या निमित्तानं राबविल्या जाणाऱ्या मोहिमेमध्ये कुणीही सहभागी होऊ शकतं, अशी घोषणा देखील त्यांनी केली.


कसं सांभाळाल सोशल मीडिया अकाऊंट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मोहिमेअंतर्गत काही ओळखीच्या महिलांना मोदींचे सोशल मीडिया अकाउंट हाताळण्याची संधी मिळणार आहे. याद्वारे कोणतीही महिला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट हाताळेल आणि महिला दिनाच्या दिवशी त्या पेजवरून ट्विट्स करेल.

ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर #SheInspireUs सह आपली कहाणी सांगून तुम्ही या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता, असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.


सोमवारी केलं होतं 'हे' ट्विट

सोमवारी रात्री ८.५६ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं की, या रविवारी ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब सारखे सोशल मीडिया अकाउंट सोडण्याचा विचार करत आहेत.

पंतप्रधानांच्या या ट्विटनंतर, अनेकांनी ट्विट करत अनेक तर्क वितर्क लावली. काही मिनिटांतच #NoSir हा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला. ज्यामध्ये पंतप्रधानांचे समर्थक त्यांना सोशल मीडिया न सोडण्याचा आग्रह करत होते.



हेही वाचा

येत्या ७ मार्चला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

दिल्ली हिंसाचार: घातपात की डोळेझाक?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा