अशीही हेरगिरी!

मुंबई - भाजपा, शिवसेनेमध्ये काडीमोड झाल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झालीय. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत पालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी हे दोन्ही पक्ष सज्ज झालेत. मात्र, याचबरोबर राजकीय पक्षांनी निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेण्यास सुरूवात केलीय.

जवळपास सगळ्याच पक्षांनी हेरगिरांना कंत्राट दिलंय. तसंच हे गुप्तहेर विरोधी पक्षातील उमेदवार काय करतात यावरही लक्ष ठेवणार आहेत. सगळ्याच पक्षांनी या गुप्तहेरांच्या नेमणुकीबाबत आम्ही त्यातले नाहीच अशी प्रतिक्रिया दिली असली तरी, दुसऱ्याने केलं म्हणून आम्ही करतो हे खासगीत सांगायला देखील ते विसरले नाहीत. त्यामुळे या हेरगिरीचा निवडणुकीच्या निकालात किती फरक पडतो हे निकाला नंतरच कळेल.

Loading Comments