Advertisement

भाजपा म्हणतेय, निलेश, नितेश नको रे बाबा !!


भाजपा म्हणतेय, निलेश, नितेश नको रे बाबा !!
SHARES

नारायण राणे यांनी घटस्थापनेचा मुहूर्त गाठून काँग्रेसला रामराम केला असला तरी त्यांनी पुढची भूमिका अद्याप तरी स्पष्ट केलेली नाही. मात्र राणे यांचा भाजपा प्रवेश त्यांच्या दोन्ही मुलांमुळे अवघड होत चालल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून 'मुंबई लाइव्ह'ला मिळाली आहे. नारायण राणे आले तरी चालतील, मात्र निलेश आणि नितेश नको रे बाबा, अशीच भाजपाची एकंदरीत भूमिका असल्याचे दिसून येत आहे.


का नकोत निलेश, नितेश ?

माजी खासदार निलेश राणे आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यातच दोघेही कुणाला कधी काय बोलतील याचा नेम नसल्याने एकवेळ राणे परवडले पण निलेश, नितेश पक्षात नकोत असा सूर भाजपाच्या गोटातून ऐकायला येत आहे.


नितेश राणे यांची वागण्याची तऱ्हा सर्वांनाच ठाऊक आहे. राम गणेश गडकरी पुतळा प्रकरण असो किंवा बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील वैयक्तिक टीका असो नितेश कुणालाही जुमानत नाही. ज्येष्ठ व्यक्तींचेही त्यांना भान राहात नाही. नितेश यांच्या कामाच्या आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे माझा कायम त्यांना विरोध राहील.
- राजन तेली, भाजपा नेते


येत्या २५ तारखेला राणेंच्या भाजपा प्रवेशावर चर्चा होणार असून, त्यानंतरच सगळे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे नारायण राणे यांच्यासोबतच निलेश आणि नितेश यांचे राजकीय भवितव्यही टांगणीला लागल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.


नारायण राणे यांनी भाजपात येताना आपल्या दोन्ही मुलांचे राजकीय पुनर्वसन करावे, अशी अट घातली आहे. राणेंच्या दोन्ही मुलांना निवडून आणणे भाजपासाठी आव्हान ठरू शकते. राणे भाजपामध्ये गेले तर नितेश राणे यांना पोटनिवडणूक लढवावी लागेल. यावेळी सर्व पक्ष एकत्र येऊन नितेश राणे यांना पाडण्याचा प्रयत्न करतील. निलेश राणे यांना देखील लोकसभा निवडणुकीत भाजपाला खासदारकीचे तिकीट द्यावे लागेल. त्यामुळे भाजपाला सध्या तरी एकावर दोन फ्री नको आहे. त्यामुळे ४ महिन्यांपासून राणेंचा भाजपातील पक्ष प्रवेश लांबला आहे.
- विवेक भावसार, ज्येष्ठ पत्रकार



हेही वाचा -

मुंबईतील राणे समर्थक नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात

'ही' आहे राणेंच्या राजीनाम्यामागील राजकीय खेळी!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा