Advertisement

राज यांचा भाजपावर 'पहिला आसूड'!


राज यांचा भाजपावर 'पहिला आसूड'!
SHARES

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, असं म्हणत फेसबुक पेजवर सक्रीय झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर पहिला आसूड ओढलाय.


पोलिसी बळाचा वापर

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत, तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण तुमची थट्टा व्हायला लागल्यावर तुम्ही पोलिसी बळाचा वापर करणार? असा प्रश्न विचारून सरकारच्या दडपशाहीवर नेमकेपणाने बोट ठेवले.



नोटाबंदीवरून टार्गेट

देशभरात सध्या नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारला घेरण्याचा विरोधकांकडून प्रयत्न होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ राज यांनीही फेसबुकवरून विचार मांडताना भाजपावर नोटाबंदीच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे.

तुम्ही केलेल्या नोटबंदीने अर्थव्यवस्था डबघाईला गेली, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महागाईने कळस गाठलाय आणि एवढं होऊन देखील लोकांनी तुम्हाला जाब विचारायचा नाही? पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत का? असा सवाल राज यांनी केला आहे.



हेही वाचा -

दाऊदची भाजपाशी सेटींग, 'फेसबुक पेज'वर राज यांची धमाकेदार एण्ट्री



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा