Advertisement

दाऊदची भाजपाशी सेटींग, 'फेसबुक पेज'वर राज यांची धमाकेदार एण्ट्री


दाऊदची भाजपाशी सेटींग, 'फेसबुक पेज'वर राज यांची धमाकेदार एण्ट्री
SHARES

''हा विनोद नाही. अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम विकलांग झाला आहे. मायभूमीत येऊन डोळे मिटण्याची दाऊदची शेवटची इच्छा आहे. त्यासाठी तो सध्या केंद्र सरकारसोबत सेटींग करत आहे. केंद्रातील मोदी सरकार मात्र दाऊदला अटक करून भारतात आणलं, जे काँग्रेसला जमलं नाही ते आम्ही केलं, असा खोटा प्रचार करत पुढील निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज होणार आहे'', असा सनसनाटी आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांनी 'फेसबुक पेज'वर धमाकेदार एण्ट्री घेतली आहे.

'फेसबुक पेज'च्या अनावरणाप्रसंगी प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात राज यांनी ठाकरी शैलीत मोदी सरकारवर हे आरोप केले. राज यांनी 'फेसबुक लाइव्ह'वर एण्ट्री घेताच २ तासांत त्यांच्या 'फेसबुक पेज'ला ४.५० लाखांच्यावर लाईक्स, फॉलोअर्स मिळाले.



नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावं हे मी त्यांच्याप्रती वाटत असलेल्या आदरापोटी म्हटलो होतो. पण मुंबईच्या अस्तित्वाला आणि मराठी माणसाला नख जरी लावण्याचा कुणी प्रयत्न केला, तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालू, तेल लावत गेलं मी आधी काय म्हटलो होतो ते...

संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढून मराठी माणसानं मुंबई मिळवली आहे. मुंबई आमची आहे, तेव्हाही होती आणि यापुढेही राहणारच... असे म्हणत राज यांनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेला हात घातला.


आणखी काय म्हणाले राज ठाकरे?

  • बायको म्हणते मी हसत नाही, नेहमी चेहरा गंभीर असतो, पण मी काय अजित पवार नाही
  • सोशल मीडियाचा मी सर्वसामान्यांपर्यंत पाेहोचण्यासाठी वापर करणार आहे
  • मी महिन्यातून एकदा तुमच्याशी 'फेसबुक लाइव्ह' द्वारे संवाद साधेल
  • आठवड्यातून लेख, व्यंगचित्राच्या माध्यमातून तुम्हाला भेटेन
  • जे व्यक्ती 'फेसबुक'वर नाहीत त्यांच्यांसाठी व्हॉट्सअप नंबर
  • त्यावर माझ्या 'फेसबुक पेज'च्या अपडेट मिळतील
  • माझ्या विरोधातील लोकांचे चांगले कामही येथे दाखवेन, पण वाईट कामांवर आसूड ओढेन
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे थापाडे, काम काही नाही फक्त इव्हेंट, भाषणे सुरू
  • मागील ६७ वर्षांपासून देश भाषणंच ऐकतोय
  • मेक इन इंडिया, स्वच्छ भारत, योगा यासारखे विषय घेतले, पण पुढे काय?
  • साफसफाईच करायची असेल तर मंत्रालय, महापालिकेत करा
  • कर्नाटक, तामिळनाडू, केरळातील लोकांना भाषेचा अभिमान
  • गुजरात मुंबईला जोडण्याचे 'त्याचे' जुने स्वप्न
  • बुलेट ट्रेनची गरज काय? मुंबई-दिल्ली, मुंबई-कलकत्ता का नाही?
  • कर्ज काढून बुलेट ट्रेन करण्यापेक्षा आत्महत्या करणाऱ्या शेतकरऱ्यांचे कर्ज माफ करा
  • सरकारकडून नुकतेच फुटबॉल सामने खेळविण्यात आले, फुटबॉल वाटले भाजपाने आणि लात मारली काँग्रेसने
  • आता दोन्हीकडील गोली म्हणताहेत बाॅल माझ्याकडे नको



हे देखील वाचा -

जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक

राज ठाकरे यांना शाखाभेटीचा मुहूर्त सापडेना!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा