या समाजसेवेमागे दडलंय काय


  • या समाजसेवेमागे दडलंय काय
SHARE

मुंबई - हजार-पाचशेच्या नोटा बंद झाल्या आणि त्या बदलण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी झाली. नोटा बदलण्यासाठी तासनतास लोक रांगांमध्ये उभे राहू लागलेत आणि यातूनच समाजसेवेच्या बहाण्यानं सरसावलेत राजकीय पक्ष. पालिका निवडणूक जवळ आली त्यामुळे आता राजकीय पक्ष या संधीचा फायदा घेणारचं अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी दिलीय. समर खडस काय म्हणातायेत ते ऐका.

मोदींनी केेलेल्या या काळ्या पैशांवरच्या सर्जिकल स्ट्राइकमुळे आधीच राजकारण्यांचे धाबे दणाणलेत. त्यातच पालिका निवडणूक जवळ आलीय. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा केविलवाणा प्रयत्न सगळेच पक्ष करतायेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या