Advertisement

नोटायण आणि राजकारण


SHARES

मुंबई -  नरेंद्र मोदींनी 1000-500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि सर्व स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर हा सर्वसामान्यांना त्रास देण्याचा प्रकार असल्याचं म्हणत मोदींवर टीकास्त्र सोडलंय. उद्धव ठाकरेंनीच मोदींवर टीका केली असं नाही, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोदींवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. राजकीय वर्तुळातून टीका होत असतााना मात्र सर्वसामान्य मोदींच्या या निर्णयांचं कौतुक करतायत. मोदींनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली पण सर्वसामान्य मात्र खूश झालाय. सोशल मीडियावर या निमित्तानं एक वाक्य मात्र खूपच लोकप्रिय झालं... देश मे पहिली बार अमिर रोया और गरीब हसा!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा