Advertisement

निर्णय अधिकाऱ्याला धमकी; कर्मचाऱ्यांचा निषेध


निर्णय अधिकाऱ्याला धमकी; कर्मचाऱ्यांचा निषेध
SHARES

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या कामासाठी प्रभाग क्रमांक 182 ते 192 मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माया पाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अनामत रक्कम न भरल्यामुळे 3 फेब्रुवारीला एमआयएम उमेदवाराचा उमेदवारी अर्ज निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला. अर्ज बाद झालेल्या अज्ञात व्यक्तीने महिला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मोबाइलवर संदेश पाठवून ठार मारण्याची धमकी दिली. याविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु संतप्त निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी 13 फेब्रुवारीला झाल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम केल्याचे निदर्शनास आले.

एमआयएमच्या उमेदवार पुष्पा दामरगिद्द 3 फेब्रुवारीला धारावीमधील प्रभाग क्रमांक 188 मधून आपले नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी गेल्या होत्या. त्या दिवशी सायंकाळी नामनिर्देशनपत्र सादर करून बलराज तेथून निघाल्या. दुसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारीला त्यांच्या नामनिर्देशनपत्राची पडताळणी करताना त्यांना अनामत रक्कम भरल्याची पावती जोडलेली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निवडणूक आयोग निर्णय अधिकारी यांनी बलराज यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर हा प्रकार घडला.

या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. मात्र संतप्त कर्मचाऱ्यांनी झालेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करायचे ठरवले आहे. या काळ्या फितीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी माया पाटोळे यांना भेटण्यास गेले असता त्यांनी भेटण्यास नकार दिला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा