मतदान केंद्रात ‘हात की निशाणी’

मालाड -  प्रभाग क्रमांक 47 मध्ये मतदान केंद्रात निवडणूक ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचारीने तिच्या टेबलवर हाताची निशाणी बनवली आणि ती मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना टेबलवर खुणवून काँग्रेसला मतदान करा असं सांगत होती. या महिलेबद्दल तक्रार येताच भाजपा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या महिलेला रंगेहाथ पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान काँग्रेस आमदार असलम शेख यांच्याकडून मालाडमधील सर्व ठिकाणी असे प्रकार घडल्याचा आरोप भाजपाचे स्थानिक नेता सतनाम सिंग तिवाना यांनी केला आहे. मात्र असलम शेख यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Loading Comments