प्लास्टिक बंदीवरून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत राज यांनी कदम यांना, अाधी स्वतःच्या खात्याचं काम नीट करा. सरकारच्या निर्णयात नातं घुसवण्याचा प्रयत्न करू नका, असा सज्जड दम दिला.