Advertisement

प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षासाठी निलंबन


प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षासाठी निलंबन
SHARES

मुंबई - विरोधी पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधामुळे शेवटी सोलापूरमधील भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचं अखेर निलंबन झालं आहे. त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासूनचं विरोधी पक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांनी प्रशांत परिचारक यांच्या वादग्रस्त विधानामुळे निलंबनाची मागणी केली होती. बुधवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते की सात सदस्यांची समिती नेमण्याचा प्रस्ताव गुरुवारी विधान परिषदेमध्ये ठेवण्यात येईल, मात्र विरोधी पक्ष यासाठी तयार नव्हते. विधान परिषदेचे गुरुवारचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रशांत परिचारक यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विधान परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशांत परिचारक यांचं दिड वर्षासाठी निलंबन केल्याची घोषणा केली. तसंच पुढील चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आलीय. समिती सदस्य चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनील तटकरे, शरद रणपिसे, नीलम गोरे, जयंत पाटील, कपिल पाटील समितीमध्ये असणार आहे.

चौकशी पूर्ण करू लवकरात लवकर चौकशी अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल.

 - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा