Advertisement

‘यांनी’ उधळलेली मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात?

आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी?

‘यांनी’ उधळलेली मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात?
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात शंका कुशंकांना पेव फुटलं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं असता, भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.

चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारिपाठाचा 'शकुनी' डाव टाकल्या शिवाय राहणार नाही.

अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण जी दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार वर बोलायला लागले.अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झालाय. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं त्यांच्याकडे काही शिल्लक नाही, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती.

हेही वाचा- “मोदी-ठाकरे भेटीनंतर चर्चा तर होणारच…”

त्याला, आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी? भाजपची ऊर्जा अक्षय आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या कष्टातून मिळवलेली आहे, थकणं भाजपच्या रक्तातच नाही! महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयातून मानसिक दिवाळखोरी दिसतंच आहे, असं प्रत्युत्तर प्रविण दरेकर यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची बैठक जवळपास तासभर चालली. या बैठकीत राज्याच्या प्रलंबित विषयांवर चर्चा झाली. 

पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित प्रश्नांवर पंतप्रधान  सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यानंतर पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला.

(pravin darekar replies amol mitkari on cm uddhav thackeray and pm narendra modi meeting)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा