Advertisement

राऊतांनी आधी शिवसेनेची चिंता करावी, पक्षात अस्वस्थता- प्रविण दरेकर

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी! कारण त्यांच्या राष्ट्रवादीची चिंता करण्याच्या धोरणामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे.

राऊतांनी आधी शिवसेनेची चिंता करावी, पक्षात अस्वस्थता- प्रविण दरेकर
SHARES

मी देवेंद्र फडणवीस यांना भेटेन, त्यांना राजकीय संन्यास घेऊ देणार नाही, असा मिश्कील टोला हाणणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी! कारण त्यांच्या राष्ट्रवादीची चिंता करण्याच्या धोरणामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे, असं वक्तव्य प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

याबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, मला वाटतं संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी. कारण अलिकडच्या काळात संजय राऊत शिवसेनेची चिंता करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त चिंता करताना दिसत आहेत. म्हणून शिवसेनेमध्ये नाराजी आणि अस्वस्थता आहे.

आजच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस किंवा राष्ट्रवादीची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची जास्त चिंता करावी. जेणेकरून शिवसैनिक त्यांना धन्यवाद देतील.

हेही वाचा- “ते म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही..”

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय निवडणुका घेऊ नका या मागणीसाठी भाजपकडून नुकतंच राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व करताना देवेंद्र फडणवीसांनी स्वत:ला अटकही करवून घेतली. यावेळी सत्ता द्या ३ महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन; नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्यावर, देवेंद्र फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही. देशात, राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. फडणवीस त्यापैकी एक आहेत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला तर भारतीय जनता पार्टीचं तसंच जनतेचंही मोठं नुकसान होईल. त्यामुळे माझ्या परीने मी त्यांची भेट घेऊन फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं.

(pravin darekar reply to sanjay raut over obc reservation issue in maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा