Advertisement

शिवतिर्थावर शपथविधीची जय्यत तयारी, ७० हजार खुर्च्या, २० एलईडी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शिवतिर्थावर शपथविधीची जय्यत तयारी,  ७० हजार खुर्च्या, २० एलईडी
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थावर जय्यत तयारी सुरू झाली आहे.  शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानात संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. 

 देशभरातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या शपथविधीसाठी बोलावलं जाणार आहे. शिवाजी पार्कमध्ये तब्बल ६ हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारलं जात आहे. या व्यासपिठावर १०० जणांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच हे व्यासपीठ तयार केलं जात आहे. याच जागेवर दरवर्षी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावाही होत असतो. 

शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्यांना बसवण्यासाठी  ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये २० एलईडी लावले जाणार आहेत. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीलाही सजवण्यात येत आहे.



हेही वाचा -

‘उद्धवदादू’च्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का राज ठाकरे?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा