Advertisement

मुंबईत भाजपाच्या मेळाव्याची जय्यत तयारी


मुंबईत भाजपाच्या मेळाव्याची जय्यत तयारी
SHARES

भारतीय जनता पार्टीच्या ६ एप्रिल रोजी होणाऱ्या महामेळाव्यासाठी राज्यभरातून पक्षाचे किमान तीन लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.


३ लाख कार्यकर्ते येणार?

भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल हा स्थापना दिवस आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या महा मेळाव्यासाठी राज्यभरातले तीन लाख कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. या मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून २८ रेल्वेगाड्यांमधून भाजपा कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांची व्यवस्था करण्यात येत असल्याचं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं.


शुक्रवारी महामेळाव्याला संबोधित केल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पक्षाच्या आमदार-खासदारांची बैठक होणार आहे.

आशिष शेलार, आमदार, मुंबई अध्यक्षहेही वाचा

हँडस अप....निकाल पैसा...!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा