Advertisement

मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन लेनचे काम मार्चपर्यंत पूर्ण करा - चंद्रकांत पाटील


मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन लेनचे काम मार्चपर्यंत पूर्ण करा - चंद्रकांत पाटील
SHARES

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास अाता वेग येणार अाहे. या महामार्गाच्या कामाचा अाढावा शुक्रवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या किमान दोन लेनचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


आढावा घ्यावा

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात ही बैठक झाली. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी देशपांडे, राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळाचे अधिकारी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसंच या मार्गाचे काम करणारे कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महामार्गासाठी बहुतांशी ठिकाणचे भूसंपादनाचे पूर्ण झाले असल्याने किमान दोन लेनचे काम येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करावे. तसंच या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घ्यावा असे निर्देश यावेळी पाटील यांनी दिले.



हेही वाचा - 

बीकेसीत सीबीआय कार्यालयाजवळ काँग्रेसची निदर्शनं

शिवस्मारक भूमिपूजनाचा घाट कशासाठी? - अजित पवार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा