Advertisement

पुण्यात सर्वाधिक मतदारांची नोंद

या चार जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

पुण्यात सर्वाधिक मतदारांची नोंद
SHARES

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांवर सुमारे 9.5 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे जिल्हा मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात आघाडीवर असून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

पुण्यात ८२ लाखांहून अधिक मतदार

पुण्यात एकूण 82 लाख 82 हजार 363 मतदार आहेत. मुंबई उपनगरात एकूण 73 लाख 56 हजार 596 मतदार आहेत. ठाण्यात एकूण मतदारांची संख्या 65 लाख 79 हजार 588, नाशिक जिल्ह्यात एकूण 48 लाख 08 हजार 499 मतदार आहेत. नागपुरात एकूण 42 लाख 72 हजार 366 मतदार आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या जास्त आहे.

चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. रत्नागिरीची एकूण 13 लाख 3 हजार 939 मतदार असून त्यात 11 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 31 हजार 012 तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 72 हजार 916 इतकी आहे.

नंदुरबारची एकूण मतदार संख्या 12 लाख 76 हजार 941 असून त्यात 12 तृतीयपंथींचा समावेश आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 37 हजार 609 तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 39 हजार 320 इतकी आहे. गोदिन्या जिल्ह्यातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे.

गोंदियातील मतदारांची एकूण संख्या 10 लाख 92 हजार 546 असून, 10 तृतीयपंथी आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 41 हजार 272 तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 51 हजार 264 इतकी आहे. सिंधुदुर्गातील मतदारांची एकूण संख्या 6 लाख 62 हजार 745 असून त्यात 1 तृतीयपंथी नोंदणीकृत आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3 लाख 30 हजार 719 तर महिला मतदारांची संख्या 3 लाख 32 हजार 025 इतकी आहे.

निवडणूक आयोगाने राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी पाच टप्प्यात मतदानाची तयारी सुरू केली आहे. 8 एप्रिल 2024 पर्यंत राज्यात एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 4 कोटी 80 लाख 81 हजार 638 पुरुष मतदार, 4 कोटी 44 लाख 04 हजार 551 महिला मतदार आणि 5 हजार 617 तृतीयपंथी मतदार आहेत.

5 जिल्ह्यांत 30 लाखांहून अधिक मतदार

अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांत 30 लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये एकूण 36 लाख 47 हजार 252 मतदार आहेत. सोलापुरात एकूण 36 लाख 47 हजार 141 मतदार आहेत. जळगावात एकूण 35 लाख 22 हजार 289 मतदार आहेत. कोल्हापुरात एकूण 31 लाख 72 हजार 797 मतदार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 30 लाख 48 हजार 445 मतदार आहेत.

बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघरमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.



हेही वाचा

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या कामासाठी विद्यार्थ्यांची नियुक्ती

राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा, पाडवा मेळाव्यात मोठी घोषणा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा