Advertisement

मुंबई-गोवा महामार्गाने केलं हैराण! चंद्रकांत पाटील यांची हतबलता

मुंबई ते गोवा महामार्ग विस्तारीकरणाचं काम गेल्या ५ वर्षांपासून सुरू आहे. महामार्गावरील भूसंपादनाबाबतचे अनेक दावे रखडलेले आहेत. पनवेल-इंदापूर टप्प्यावरील संपादनाचा मोबदला आणि त्यापुढील जमिनीसाठी वेगळा मोबदला असल्याने अनेक दावे दाखल करण्यात आले आहेत. या दाव्यांचा वेळेत निपटारा होत नसल्याचा मुद्दा सदस्य सुनील तटकरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला.

मुंबई-गोवा महामार्गाने केलं हैराण! चंद्रकांत पाटील यांची हतबलता
SHARES

बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न प्रत्येक अधिवेशनात सरकारला विचारला जातो. त्यावर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील देखील प्रत्येक वेळी अमूक तारखेपर्यंत महामार्गाचं काम नक्की पूर्ण होणार, असं आश्वासन देतात. शुक्रवारी मात्र या रखडलेल्या कामाबाबत पाटील यांनी पहिल्यांदाच हतबलता व्यक्त केली. महाराष्ट्रात हैराण करणारे खूप कमी प्रकल्प आहेत. पण मुंबई-गोवा महामार्गाने प्रचंड हैराण केल्याचं वक्तव्य पाटील यांनी विधान परिषदेत केलं.

किती वर्षांपासून काम सुरू?

मुंबई ते गोवा महामार्ग विस्तारीकरणाचं काम गेल्या ५ वर्षांपासून सुरू आहे. महामार्गावरील भूसंपादनाबाबतचे अनेक दावे रखडलेले आहेत. पनवेल-इंदापूर टप्प्यावरील संपादनाचा मोबदला आणि त्यापुढील जमिनीसाठी वेगळा मोबदला असल्याने अनेक दावे दाखल करण्यात आले आहेत. या दाव्यांचा वेळेत निपटारा होत नसल्याचा मुद्दा सदस्य सुनील तटकरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला.

किती दावे प्रलंबित?

इंदापूरच्या पुढे २८ जणांनी जमिनीच दिली नसल्याने यंदाच्या वर्षीही मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार नसल्याचं शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितलं.

यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील वाढीव मानधनाचे ७२५ दावे लवादाकडे आले आहेत. त्यातील १३४ दाव्यांची सुनावणी सुरू असून ४३ प्रकरणांचा निकाल प्रलंबित आहे. फक्त एका दाव्याचा निकाल देण्यात आला आहे.

दुसरा टप्पा वेगात

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झारप या दुसऱ्या टप्प्यातील काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र, पनवेल-इंदापूरचा पहिला टप्पा मात्र रखडल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. या टप्प्यातील दावे निकाली काढण्यासाठी लवकरात लवकर सुनावण्या घेण्यात येतील. तसंच, सोमवारी जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं.

हेही वाचा-

मुंबई-गोवा हाय-वे 2019 पर्यंत पूर्ण करणार - चंद्रकांत पाटील

फेरी बोटने गाठा 'मुंबई टू गोवा'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा