Advertisement

रेल्वे भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष ठेवा; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

आगामी काळात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघणार आहे. या रेल्वे भरतीमध्ये महाराष्ट्रातल्या मुला-मुलींनाच नोकरी मिळेल आणि या भरतीमध्ये बाहेरचे घुसणार नाहीत यावर लक्ष ठेवा', असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

रेल्वे भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष ठेवा; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश
SHARES

आगामी काळात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघणार आहे. या रेल्वे भरतीमध्ये महाराष्ट्रातल्या मुला-मुलींनाच नोकरी मिळेल आणि या भरतीमध्ये बाहेरचे घुसणार नाहीत यावर लक्ष ठेवा', असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी यंदा रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती होणार असल्याची घोषणा केली होती.


रेल्वे भरतीचा फायदा मराठी तरुण-तरुणींनाच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 'रेल्वे भरतीत मराठी मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २००८ साली एक मोठं आंदोलन उभारलं होतं. त्या आंदोलनाचा परिणाम असा की पुढे रेल्वे भरतीच्या परीक्षांच्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात येऊ लागल्या, आणि त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेत परीक्षा देणं आणि नोकरीत निवड होण्यासाठी स्थानिक भाषा येणं सक्तीचं केलं गेलं.आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर रेल्वे भरती आहे. ह्या रेल्वे भरतीचा फायदा माझ्या मराठी तरुण-तरुणींनी घ्यायलाच हवा. पण त्यासाठी फॉर्म कसा भरावा, तयारी कशी करावी याचं मार्गदर्शन पण त्यांना व्हायला हवं. याच उद्देशानं माझे पक्षातील सहकारी अभिजित पानसे यांनी एका तज्ज्ञांची मुलाखत घेतली आहे, ती मुलाखत पाहण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी युवकांना केलं आहे. ही २० मिनिटाची मुलाखत शांतपणे ऐका. त्यात सांगितल्याप्रमाणे तयारी करा, अर्ज भरा. झटून अभ्यास करा, यश नक्की मिळेल. आणि तरीही काही अडचण आलीच तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे आणि तसंच या भरतीत बाहेरचे घुसणार नाहीत आणि फक्त महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल याकडं महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवावं', असं मत राज ठाकरे यांनी आपलं व्यक्त केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement