Advertisement

राजू शेट्टींचं ठरलं, होणार राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार

राजू शेट्टी यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजू शेट्टींचं ठरलं, होणार राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार
SHARES

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवार १६ जून २०२० रोजी बारामतीत भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी (raju shetti ready to become mlc from ncp quota after meeting with sharad pawar) दिली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना आमदारकीचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरच या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेईन, असं त्यांनी सांगितलं होतं.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या शेट्टी यांनी भाजपपासून फारकत घेतली होती. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जवळ आले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी देखील झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी शेट्टी यांचा पराभव केला होता. तेव्हापासून ते राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक होते. 

हेही वाचा - राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीची आॅफर

जयंत पाटील यांच्या प्रस्तावानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची एक जागा देण्यात येईल तसंच विधानसभा निवडणुकीच्या वेळेस स्वाभिमानीसाठी एक जागा सोडण्याचं ठरलं होतं. हे आश्वासन कसं पाळायचं हे सर्वस्वी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर अवलंबून आहे. सोबतच शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच या आॅफरवर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारल्यावर ते महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार होतील.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा लवकरच रिक्त होणार आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ४ जागा येण्याची शक्यता आहे. त्यातील एका जागेवर राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजू शेट्टी यांना आमदारकी मिळावी यासाठी आग्रही होते.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा