शिवसेना आणि 'खंबाटा', पाणी मुरतंय कुठं? - राम कदम

 Mumbai
शिवसेना आणि 'खंबाटा', पाणी मुरतंय कुठं? - राम कदम
Mumbai  -  

दादर - खंबाटा एविएशनकडून मातोश्रीवर काम करणाऱ्या कामगारांना पगार दिले जातात. नक्की काय नातं आहे शिवसेना आणि खंबाटा एविएशनचं? पाणी नक्की कुठे मुरतंय? असा सवाल भाजपाचे आमदार आणि प्रवक्ता राम कदम यांनी केला आहे.

सामनामध्ये शनिवारच्या अंकात 'होय मी बॉस आहे आणि राहणारच' अशी हेडलाइन छापून आल्यामुळे शनिवारी भाजप कार्यालयात भाजपा प्रदेश प्रवक्ता राम कदम यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'आजच्या सामनाची हेडलाइन होय मी बॉस आहे, परंतु लोकशाहीमध्ये कुणीच कुणाचा बॉस नसतो, प्रायव्हेट कंपनीत बॉस असतात. सध्या मुंबई महापालिकेचा कारभार व्हिटीतून नाही तर वांद्र्यातून होतो' असा जोरदार घणाघात त्यांनी शिवसेनेवर केला.

'गेल्या 25 वर्षांत शिवसेनेने मुंबईला भकास केले. आज शिवसेनेच्या नेत्यांच्या गाड्या झाल्या पण गरीब शिवसेना कार्यकर्त्यांना काय मिळाले? त्यामुळे आज शिवसेनेच्या कारभारावर नाराज असलेले शिवसेना कार्यकर्ते भाजपात येत असल्यामुळे उद्धव ठाकरेंना सांगावं लागत आहे होय मी बॉस आहे असेही राम कदम म्हणाले. शिवसेनेच्या सभेत आंबेडकरांचा फोटो का नाही? उद्धव ठाकरे चैत्यभूमीला कधीच का जात नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Loading Comments