‘ते’ विधान बालीशपणाचं; आठवलेंचा राज ठाकरेंवर शाब्दीक हल्ला

राज ठाकरेंसारख्या नेत्याने तशा प्रकारचे वक्तव्य करणं हे बालिशपणाचं लक्षण असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला.

SHARE

पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्या हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घडवून आणल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा आठवले यांनी समाचार घेतला. राज ठाकरेंसारख्या नेत्यानं अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे बालीशपणाचं लक्षण असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला. 


राजकारण नको

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पुलवामातील हल्ल्यामागं हात असल्याचं समोर आलं आहे. परंतु राज ठाकरे यांनी त्या हल्ल्यामागं मोदींचा हात असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्यासारख्या नेत्यानं असं वक्तव्य करणं हे बालिशपणाचं लक्षण असल्याची टीका आठवले  यांनी उल्हासनगरमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवरून कोणीही राजकारण करू नये. केवळ निवडणुकांचा फायदा घेण्यासाठी नाही तर पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी हा एअर स्ट्राईक केल्याचं स्पष्टीकरण आठवले यांनी दिलं.


काय आहे प्रकरण ?

कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसंच यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याही चौकशीची मागणी केली होती. हेही वाचा - 

राज शनिवारी कुणावर करणार 'सर्जिकल स्ट्राईक'?

दृष्टीहीन वैज्ञानिकांची शहिदांच्या कुटुंबीयांना मदत
संबंधित विषय
ताज्या बातम्या