Advertisement

एकनाथ शिंदेची राज ठाकरेंसोबत ‘फोन पे चर्चा’!

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेची राज ठाकरेंसोबत ‘फोन पे चर्चा’!
SHARES

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) फोन केल्याची माहिती आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात एएनआयनं वृत्त दिलं आहे,.  

एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींवर दोन्ही बड्या नेत्यांमध्ये काय भाष्य करण्यात आलं, काही चर्चा झाली का, याबाबत गुप्तता बाळगली जातेय.

शिवसेना बंडखोरांच्या गटाला मान्यता न मिळाल्यास दुसरा पर्याय ही एकनाथ शिंदे गटाकडून पाहिला जात आहे. कायदे तज्ञांच्यामते शिंदे यांच्या सोबत दोन तृतीयांश गट सोबत असला तरी त्यांना हा गट दुसऱ्या पक्षात विलीन करावा लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटासमोर भाजप आणि प्रहार असे दोन पर्याय होते. पण आता शिंदे गटासाठी नवा पर्याय उपलब्ध झाल्याची चर्चा आहे.

नवीन चर्चेनुसार शिंदे गटाकडे मनसेचा देखील पर्याय उपलब्ध आहे. याबाबत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सध्या मनसेचा विधानसभेत एकच आमदार आहे.

शिवसेनेशी काडीमोड करत राज ठाकरे यांनी स्वत:चा मनसे पक्ष स्थापन केला. सुरुवातीला मराठीची कास धरत त्यांनी पक्षाचं इंजिन पुढे नेलं. पण विधानसभा निवडणुकीत पाहिजे तसं यश न मिळाल्याने त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याचं देखील बोललं गेलं.

तसंच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी वारंवार सागितलं आहे की, ते हिंदुत्वासाठी वेगळे होत आहेत. त्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे, ती बाळासाहेब ठाकरेंच्या पद्धतीची आहे असा दावा मनसेकडून केला जातो. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



हेही वाचा

'नाच्यांची वाय झेड' म्हणत सामनातून भाजपावर टीका

बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांना टोला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा