Advertisement

'महाजाॅब्ज' पोर्टलवरील ‘या’ नोंदणीकृत बेरोजगारांना राज्य सरकार देणार प्रशिक्षण

महाराष्ट्र सरकारच्या ८४०३ नोंदणीकृत अकुशल बेरोजगारांना कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडे वर्ग केलं जाणार असून तिथं त्यांना आवश्यकतेनुसार व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

'महाजाॅब्ज' पोर्टलवरील ‘या’ नोंदणीकृत बेरोजगारांना राज्य सरकार देणार प्रशिक्षण
SHARES

महाराष्ट्र सरकारच्या ८४०३ नोंदणीकृत अकुशल बेरोजगारांना कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडे वर्ग केलं जाणार असून तिथं त्यांना आवश्यकतेनुसार व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. (registered unskilled unemployed persons on mahajobs will get training from skill development department of maharashtra government)

राज्यातील उद्योगांना लागणारं कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग, कामगार विभागाच्यावतीने महाजॉब्ज पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. या पोर्टलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २ लाख ८६ हजार जणांनी या पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८४०३ अकुशल नोकरी शोधकांची नोंद झाली असून त्यांना प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे.

महाजॉब्ज पोर्टलचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - मराठी तरूणांना मिळणार रोजगार, मनसेच्या वेबसाईटचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

महाजॉब पोर्टलद्वारे आतापर्यंत २ लाख ८६ हजार जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २८ हजार १६७ जणांनी सर्व माहितीसह आपलं प्रोफाईल पूर्ण केलं आहे. त्यामध्ये २० हजार ६५१ कुशल व अर्धकुशल तर ८४०३ अकुशल कामगार म्हणून नोंदणी झाली आहे. अकुशल नोकरी शोधकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडे वर्ग करण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत.

प्रथम दहा उच्चतम दर्जाचे रोजगार कौशल्य असणाऱ्या क्षेत्रांमध्ये पणन अधिकारी, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टूल ऑपरेटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, ऑफिस असिस्टंट, व मनुष्यबळ विकास आदी क्षेत्रामध्ये इच्छुकांनी अधिक प्राधान्य दिलं आहे. या व्यवसाय क्षेत्रातील मनुष्यबळ कंपन्यांना सुलभरीत्या उपलब्ध व्हावं, यासाठी संबधितांना सूचना दिल्या आहेत.

सरकारचं महाजाॅब्ज पोर्टल हे नोकरी इच्छुक बेरोजगार आणि कंपन्या यांच्यामधील दुव्याचं काम करत आहे. कंपनीला आवश्यक मनुष्यबळाच्या मागणीनुसार कौशल्यपूर्ण इच्छुक बेरोजगारांना रोजगाराची संध्या या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हेही वाचा - नोकरी इच्छुक उमेदवारांनो, आधार कार्ड लिंक करा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा