Advertisement

'त्या' शिक्षकांचं वेतन तातडीने करा, नाना पटोले यांच्या सूचना

शिक्षकांना तातडीने वेतन मिळण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शालेय शिक्षण विभागाला दिल्या.

'त्या' शिक्षकांचं वेतन तातडीने करा, नाना पटोले यांच्या सूचना
SHARES

राज्यात अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग समावेशीत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेळेत वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या शिक्षकांना तातडीने वेतन मिळण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शालेय शिक्षण विभागाला दिल्या. (release salary of Adjusted teachers directs maharashtra vidhan sabha speaker nana patole to education department )

राज्यात केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत आलेल्या अपंग समावेशीत योजनेचा आढावा मंगळवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला. यावेळी योजनेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचं वेतन तातडीने देण्यात यावं यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

हेही वाचा - मनिषा म्हैसकर पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत 

राज्यातील अपंग समावेशीत योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेळेत वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या तक्रारींची दखल घेतली जात नाही, असं म्हटलं जात होतं. कोरोना संकटाच्या काळात अंमलबजावणीत दिरंगाई झाली असली, तरी या शिक्षकांना तातडीने वेतन मिळावे यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत अशा सूचना नाना पटोले यांनी दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक अश्विनी जोशी आणि शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, राज्यात सुरु असलेली उच्च शैक्षणिक सस्थांमधील भरती प्रक्रिया १०० पदांच्या बिंदूनामावलीच्या केंद्र शासनाच्या नियमावलीनुसारच राबवण्यात यावी. इतर मागास प्रवर्गांसह अन्य मागास प्रवर्गांवर गेल्या २५ वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी भरती आणि पदोन्नतीबाबतच्या धोरणाचा सूत्रबद्ध प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करुन संविधानाने दिलेल्या अधिकारांची जपणूक व्हावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी दिले.

महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरतीकरीता असलेल्या १०० बिंदूनामावलीत इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या संवर्गावरील अन्याय दूर करण्यासंदर्भात नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा