Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

मनिषा म्हैसकर पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून मनिषा म्हैसकर यांनी मंगळवार २१ जुलै रोजी पदभार स्वीकारला.

मनिषा म्हैसकर पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत
SHARES

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून मनिषा म्हैसकर यांनी मंगळवार २१ जुलै रोजी पदभार स्वीकारला. मनिषा म्हैसकर या १९९२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात विविध विभागात कामकाज केलं आहे. (ias manisha mhaiskar took a charge of principal secretary of environment department)

बदलत्या हवामानाची व पर्यावरणाची दखल घेण्याचं काम राज्याचा पर्यावरण विभाग विविध योजनांतून व उपक्रमांतून करीत असतो. पर्यावरण रक्षणात शासकीय उपाययोजना, पर्यावरण विषयक कायदे, व्यापक जनजागृती आणि सर्वसामान्य माणसाचा आग्रही सहभाग याकरीता पर्यावरण विभागाचे कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर दिला जाईल, असं म्हैसकर यांनी यावेळी सांगितलं. 

हेही वाचा - भरती प्रक्रियेत कुणावरही अन्याय होणार नाही- नाना पटोले

गेली ५ वर्षे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम करीत असताना केंद्रीय स्तरावर राज्याला सातत्याने अव्वल स्थानावर नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांचा यापूर्वीचा मुंबई महानगरपालिकेत साडेचार वर्षे अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई शहरातील कोविड १९ च्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मनिषा म्हैसकर यांनी शासनाच्या विविध विभागात काम करताना यापूर्वी राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून नावीन्यपूर्ण योजनांतून शासकीय कामकाजाच्या प्रसिद्धीला वेगळी दिशा दिली होती. विशेषत: लोकराज्य मासिकाचा वाचक वर्ग व लाखो प्रतींचं वितरण हे त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान ठरलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा