'समाज क्रांतिकारक सावरकर'

 Dadar
'समाज क्रांतिकारक सावरकर'

दादर- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 52 व्या आत्मार्पण वर्षानिमित्त इतिहास संशोधक प्रा. पांडुरंग बलकवडे यांचे समाज क्रांतिकारक सावरकर या विषयावर रविवारी सायंकाळी व्याख्यान आयोजित केले होते. दादरच्या सावरकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना इतिहास संशोधक प्रा. बलकवडे म्हणाले, देशातल्या लाखो क्रांतीकारकांनी बलिदान दिले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाले, स्वातंत्र्यासाठी झगडताना सावरकरांना आणि देशभक्तांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. तसंच सावरकरांचे तत्वज्ञान हे वेगळे तत्वज्ञान होते. सावरकरांनी सांगितलेले तत्वज्ञान पुढच्या 100 वर्षांनीही ताजे आणि समाजहिताचे असेल यात शंका नाही असेही यावेळी प्राध्यापक बलकवडे म्हणाले.

Loading Comments