गिरगावकरांची अतिक्रमणापासून सुटका होणार?

 Girgaon
गिरगावकरांची अतिक्रमणापासून सुटका होणार?
Girgaon, Mumbai  -  

गिरगाव – येथील डी विभागातल्या सिक्कानगरमधील प्रभाग क्रमांक 215 मध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे इथले रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे पदपथावर अतिक्रमण इतके वाढले आहे की नागरिकांना जाण्यायेण्याचाही त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार तक्रारी करूनही स्थानिक नगरसेवक सुरेंद्र बागलकर अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे फुटपाथवर बेकायदा थाटलेल्या या संसारामुळे परिसरात दुर्गंधीचे प्रमाणही वाढले आहे. मात्र आता या सगळ्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवार मिनल जुवाटकर यांनी उडी घेतली आहे. 'जर निवडून आले तर अतिक्रमण हटवणार' अशी ग्वाहीच त्यांनी मतदारांना दिली आहे.

Loading Comments