Advertisement

छातीत दुखू लागल्याने लालू 'एशियन हार्ट'मध्ये दाखल


छातीत दुखू लागल्याने लालू 'एशियन हार्ट'मध्ये दाखल
SHARES

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना उपचारासाठी मुंबईतल्या एशियन हार्ट इंस्टिट्यूट या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्याने आणि शरिरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्याने लालू यांना मंगळवारी मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.


फिस्तुलाची शस्त्रक्रिया अावश्यक

त्यांच्या हृदयाला जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून फिस्तुलाची शस्त्रक्रिया अावश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर किडनीचे उपचार केले जातील. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे किडनीची शस्त्रक्रिया शक्य नाही. त्यामुळं २ अाठवड्यात हिमोग्लोबिन वाढवण्याचा सल्ला दिला अाहे. त्यांचं हिमोग्लोबिन अाता ९.९ टक्के अाहे. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार शस्त्रक्रियेसाठी हिमोग्लोबिन कमीत कमी ११ टक्के असणं अावश्यक अाहे.


एशियन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये उपचार

यापूर्वी लालू २२ मे ला मुंबईत उपचारासाठी अाले होते. वैद्यकीय कारणासाठी ६ महिने रांची तुरुंगातून सुटलेले लालू प्रसाद यादव यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये उपचार केले जात अाहेत. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार ते २ अाठवड्यांसाठी पाटनाला परत गेले होते.

लालू यांना किडनी आणि डायबिटीज हे आजार आहेत. लालूयादव यांच्यावर हृदय रोग तज्ज्ञ डॉ. पांड्या उपचार करणार आहेत. तीन वर्षांपूर्वी लालू यादव यांच्यावर बायपास सर्जरी त्यांनी केली होती.

मुंबईतील उपचारानंतर लालूयादव किडनीवरील उचारासाठी कर्नाटक राज्यातील बंगळुरुमध्ये जातील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.


चारा घोटाळा प्रकरण

पशुखाद्य गैरव्यवहार (चारा घोटाळा) प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना 'सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. याचसोबत ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. १९९०च्या दशकात डुमका ट्रेझरीमधून गैरमार्गाने ३.१३ कोटी रुपये काढल्याप्रकरणी न्यायाधीशांनी लालू आणि इतर १७ जणांना दोषी ठरवले. सध्या लालू शिक्षा भोगत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement