Advertisement

महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे सभागृहात येत नाहीत : रोहित पवार

राहुल शेवाळे यांच्याकडून गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत.

महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे सभागृहात येत नाहीत : रोहित पवार
SHARES

राहुल शेवाळे यांच्याकडून गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत.

संसदेत कधीही न बोलणारे खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका (BMC) डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर आरोप केले. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करुन असे खोटे आरोप होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी केला.

भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करत आहेत. यापूर्वी बिहारची निवडणूक असताना सुशातसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे राजकारण करण्यात आले. गुजरात निवडणुका आल्या तेव्हा महाराष्ट्रातील प्रकल्प (Maharashtra Projects) पळवण्यात आले. कर्नाटक निवडणुका (karnataka election) येताच सीमावाद तापवण्यात येत आहे. तसाच प्रकार 'एयू' बाबत आहे.

मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की बोलू दिले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे सभागृहात येत नाहीत, असे रोहित पवार म्हणाले. मोघम बोलून विषय टाळण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

रिया चक्रवर्तीला AU नावाच्या व्यक्तीने 44 फोन का केले होते. AU म्हणजे आदित्य ठाकरे असा आरोप राहुल शेवाळे यांनी सभागृहात केला. त्यानंतर पुन्हा एकदा याप्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.



हेही वाचा

Disha Salvian Death Case: आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल - नितेश राणे

आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, राहुल शेवाळेंचा आरोप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा