Advertisement

रामदास आठवलेंना पाहिजे विधानसभेच्या १० जागा

भाजप-शिवसेनेचं जागा वाटपाचं सूत्र अद्याप ठरलेलं नसताना भाजापचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (RPI. A.)ने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी १० जागांची मागणी केली आहे.

रामदास आठवलेंना पाहिजे विधानसभेच्या १० जागा
SHARES

भाजप-शिवसेनेचं जागा वाटपाचं सूत्र अद्याप ठरलेलं नसताना भाजापचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (RPI. A.)ने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी १० जागांची मागणी केली आहे. ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. 

२३ जागांचा प्रस्ताव

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर २३ जागांचा प्रस्ताव ठेवला असून त्यापैकी १० जागांवर भाजपने तातडीने विचार केला पाहिजे. तसंच ‘आरपीआय’ला कोणत्या जागा सोडणार आहेत हे देखील भाजपने स्पष्ट करावं, असं आठवले म्हणाले. 

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ‘आरपीआय’ला ८ जागा सोडण्यात आल्या होत्या. यंदा त्यांनी २ जागा वाढवून मागितल्या आहेत. 

मेट्रो कारशेड योग्य

आठवले यांनी आरेतील कारशेडच्या मुद्द्यावर भाजपचं समर्थन देखील केलं. ते म्हणाले की, "विकासकामांमध्ये थोड्याफार प्रमाणात अडचणींचा सामना करावाच लागतो. परंतु कुठल्याही अडथळ्यांमुळे विकासकामं थांबता कामा नये. सरकारपुढं कुठलाही पर्याय नसल्यानेच आरेत मेट्रोचं कारशेड बनवण्याची परवानगी देण्यात आली. मेट्रोमुळे वाहतूककोंडीची समस्या दूर होईल आणि अपघातांमध्येही घट होईल."


हेही वाचा-

मी जिथं जातो तिकडचं पारडं जड होतं- राणे

आरेच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेला पाठिंबा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा