Advertisement

हवेची दिशा पाहूनच निर्णय - रामदास अाठवले

मी हवा पाहून अंदाज घेत होतो. त्यानुसार हवा कोणत्या दिशेने जातेय याचा अंदाज घेऊन कोणाला साथ द्यायची याचा निर्णय घेणार, असं रामदास अाठवले यांनी म्हटलं अाहे.

हवेची दिशा पाहूनच निर्णय - रामदास अाठवले
SHARES

अवघ्या काही महिन्यांवर अालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अाघाडी, युतीसाठी सर्वच पक्षांनी लहान-मोठ्या पक्षांची चाचपणी सुरू केली अाहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री अाणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं अाहे. मी हवा पाहून अंदाज घेत होतो. त्यानुसार हवा कोणत्या दिशेने जातेय याचा अंदाज घेऊन कोणाला साथ द्यायची याचा निर्णय घेणार, असं रामदास अाठवले यांनी म्हटलं अाहे. अाठवले यांनी या वक्तव्यातून भाजपा अाणि काँग्रेस असे दोन्ही पर्याय खुले ठेवल्याचे सूचीत केले अाहे. 



भाजपाबरोबरही १०-१५ वर्ष 

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना ज्या पक्षाची सत्ता यायची खात्री अाहे त्या पक्षाबरोबर राहण्याचेच संकेत रामदास अाठवले यांनी दिले. काँग्रेसचे अामदार नसीम खान यांनी अाठवले यांनी काँग्रेसबरोबर यावं असं म्हटलं. यावर बोलताना अाठवले म्हणाले, मी १० ते १५ वर्ष काँग्रेसबरोबर होतो. त्यामुळे भाजपाबरोबरही मला १० ते १५ वर्ष रहावेच लागेल. अापण हवेचा अंदाज घेत अाहोत. हवा कोणत्या दिशेने वाहत अाहे त्यानुसारच निर्णय घेणार अाहे. 


मंत्रिपदाची चिंता नाही

माझे कार्यकर्ते तळागाळात असल्यामुळे मला मंत्रिपदाची चिंता नाही. मला खूप दिवसांनी मंत्रीपद मिळाले अाहे. मात्र, मंत्रीपद नसले तर जनता माझ्या पाठिशी उभी राहील, असंही यावेळी अाठवले यांनी म्हटलं. दरम्यान, अाठवले यांनी याअाधीही भाजपाच्या विसंगत भूमिका घेतली अाहे.  राम मंदिराच्या जागी बुद्धविहार असल्याचे सांगत अयोध्येत बुद्धविहार बांधण्याची मागणी त्यांनी केली होती. 



हेही वाचा - 

'उन्होने नोट बदले, हम पीएम बदलेंगे'- संजय निरूपम

मुंबईचे डबेवालेही जाणार अयोध्येला, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा