शिवसैनिकांनी वाहिली श्रद्धांजली

  मुंबई  -  

  शिवाजी पार्क - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवसैनिक यांचं अतुट नातं. साहेबांसाठी त्यांचे सर्व शिवसैनिक समान. मग तो मुंबईतला असो वा खेड्यापाड्यातला. बाळासाहेब ठाकरे यांच्या चौथा स्मृती दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्कवर जनसागर लोटला. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले होते ते बाळासाहेबांवर असलेल्या प्रेमापोटी. कोणतंही राजकीय पद आमच्याकडे नसलं तरीही शिवसेना प्रमुखांनी दिलेलं शिवसैनिक हे पद आमच्यासाठी खूप मोलाचं आहे, असं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं.

  शिवसेनेवर अनेक संकटे आली. एकवेळ अशी होती की, शिवसेनाच संपुष्टात येते की, काय अशी परिस्थिती होती. परंतु बाळासाहेबांच्या याच शिवसैनिकांनी त्यांची साथ कधी सोडली नाही. आणि बाळासाहेबांसोबत खांद्याला खांदा लावून समस्यांचा धीराने सामना केला. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.