Advertisement

सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम चालत असेल : बाळासाहेब थोरात

काल सागर बंगल्यावर फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम चालत असेल : बाळासाहेब थोरात
SHARES

अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची आज मागणी करणार आहे. सध्या राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं, असं आवाहन काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं आहे.

तसेच, काल सागर बंगल्यावर फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) आणि मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना सागर बंगला (Sagar Bungalow) कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी चिमटा काढला आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "सध्या राज्यात जे घटतंय ते लोकशाहीला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या राज्यघटनेप्रमाणे नाही. त्यामुळे आम्हा सर्वांना एकत्र येऊन याचा विरोध करावा लागणार आहे."

आयपीएस रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना 2015 ते 2019 या कालावधीत राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप आहे. फोन टॅपिंग प्रकरणात 2021 पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचा संदर्भ देत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील 9 राजकीय नेत्यांचे फोन विविध नावाने टॅप केल्याचा रश्मी शुक्लांवर आरोप आहे. या प्रकरणात 16 मार्च 2022 रोजी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यान्वये मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.



हेही वाचा

विनायक मेटेंच्या मृत्यूची CID चौकशी, CM एकनाथ शिंदेंचे आदेश

जांबोरी मैदान तो झांकी है पिक्चर अभी बाकी है : आशिष शेलार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा