शिवसेना संधीसाधू - संभाजी ब्रिगेड

 CST
शिवसेना संधीसाधू - संभाजी ब्रिगेड

सीएसटी - मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेने हार्दिक पटेल यांचे मातोश्रीवर स्वागत केले. गुजराती समाजाची मते मिळवण्यासाठी शिवसेना संधीसाधू होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता सुहास राणे यांनी केलाय.

शिवसेनेविरोधात संभाजी ब्रिगेड 

कुरघोडीसाठी ब्रिगेडकडून हार्दीक पटेलविरोधात चिराग पटेल यांना आणण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेडने शिवसेनेवर सरशी साधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाची कोंडी करण्यासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांना शिवसेनेने मुंबईत आणले होते.

मात्र हार्दीक नादान असून, हे त्याचे वैयक्तिक मत असल्याचे चिराग पटेल म्हणालेत. गुजरातमध्ये पाटीदार समाजावर अन्याय करणाऱ्या भाजपाच्या सहयोगी पक्षाला पाटीदार बांधव कधीच समर्थन देणार नाहीत. शिवसेनेची विचारधारा भाजपासोबत असून, त्याला कधीही पाठिंबा देता येणार नाही. समितीच्या समन्वयकांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

Loading Comments