बावदाणेंचं आव्हान वाटत नाही - संगिता पडवळ

  Ghatkopar
  बावदाणेंचं आव्हान वाटत नाही - संगिता पडवळ
  मुंबई  -  

  घाटकोपर - पालिका निवडणुकीत काही पक्षांनी त्यांच्या माजी नगरसेवकांवर विश्वास दाखवत पुन्हा उमेदवारी दिली आहे. प्रभाग 123 मध्ये शिवसेनेतून डॉ. भारती बावदाणे यांना पक्षाने पुन्हा तिकीट दिले आहे. याच प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या उमेदवार संगिता पडवळ या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

  'माजी नगरसेविका बावदाणे यांनी गेली पाच वर्ष कोणातेही काम केले नाही, त्यामुळे त्यांचे आपल्याला आव्हान वाटत नाही', असे भाजपाच्या उमेदवार संगिता पडवळ यांनी सांगितले. तर प्रभाग 132 मध्ये मनसेकडून बॉबी चंदेलिया यांना तिकीट देण्यात आले आहे. याच प्रभागात काँग्रेसकडून प्रविण छेडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.