Advertisement

संजय कुमार राज्याचे मुख्य सचिव, अजोय कुमार यांची जागा घेणार

अजोय मेहतां यांच्यावर पुढे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

संजय कुमार राज्याचे मुख्य सचिव, अजोय कुमार यांची जागा घेणार
SHARES

सध्याचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांना पुढे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. १ जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम सांभाळणार आहेत. त्यांच्या जागी संजय कुमार यांची वर्णी लागली आहे.

व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्यानं अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे अजोय मेहता यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

१९८४च्या बॅचचे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगानं कार्यान्वित करण्याची जबाबदारी पार पाडतील. याशिवाय त्यांच्यावर नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी देखील असेल.

संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.



हेही वाचा

एका लग्नाची गोष्ट! लग्नाचे पैसे वाचवून क्वारंटाईन सेंटरला मदत

खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी पालिकेचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा