Advertisement

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांच्या मुलावर गंभीर आरोप

खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे.

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांच्या मुलावर गंभीर आरोप
SHARES

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे योगेश देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे.  शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला कशी दिली? एकदा राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? असा सवाल योगेश देशपांडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. 

हेही वाचा

आता शिवसेना भवनावर कोणाचा हक्क असणार?

उद्धव ठाकरेंकडून शिवसेना-धनुष्यबाण निसटल्यावर राज ठाकरेंची ट्विटरद्वारे चपराक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा