संजय राऊत हाजीर हो!

  Pali Hill
  संजय राऊत हाजीर हो!
  मुंबई  -  

  मुंबई - वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न राहणारे सामनाचे कार्यकारी संपादक

  संजर राऊत यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कडक शब्दात ताशेरे ओढले. शिवसेनाप्रमुख बाऴासाहेब ठाकरे यांच्या येत्या 27 अॉक्टोबरला होणाऱ्या सुनावणीस संजय राऊत हजर न झाल्यास त्यांना कोर्टात आणले जाईल, असे न्यायालयाने बजावले आहे.
  मुंबई उच्च न्यायालयाच्या समन्सचा सम्मान न करणे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना महागात पडताना दिसत आहे. समन्स च्या दोन तारखांना संजय राऊत यांचं गैरहजर असंण न्यायालयाला पटलेले नाही. आता न्यायमूर्ती पटेल यांनी राऊतांना २७ तारखेला कोर्टात हजार राहण्याचे आदेश दिले असून, त्या दिवशी त्यांच्या उलटतपासणीची तारिख ठरवण्यात येईल.
  बाळासाहेब ठाकरेंच्या मुत्युपत्रासंबंधी साक्ष देण्यासाठी २६ ऑगस्टला संजय राइट यांना समन्स बजावण्यात आले होत, पहिल्या तारखेला गैरहजर राहिल्यानंतर सोमवारी देखील संजय राऊत हे न्यायालयात हजर राहिले नाहीत. राऊत हे मुंबईत नसून ते १८ तारखेला मुंबईत परततील, असे सामानाच्या कर्मचाऱ्याने कोर्टाला कळवले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्राच्या खटल्यात सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना देखील साक्षीदार बनवण्यात आले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.