Advertisement

सेना भवनच्या बाहेर एलईडी स्क्रीन, ‘झुकेगा नही’ची पोस्टरबाजी

शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होणार असल्यानं या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे.

सेना भवनच्या बाहेर एलईडी स्क्रीन, ‘झुकेगा नही’ची पोस्टरबाजी
SHARES

शिवसेना नेते संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत मोठा बॉम्ब फोडणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होणार असल्यानं या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे.

सेना भवनाच्या बाहेर भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. तसेच एलईडी स्क्रीनही लावण्यात आल्या आहेत. झुकेगा नही, अशी पोस्टरबाजीही सेना भवनाच्या बाहेर करण्यात आली आहे.

संजय राऊत यांनी ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल असं स्पष्ट केलं आहे. शिवसेना बोलेल आणि देश ऐकेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राऊत कोणता बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना भवनातील भव्य हॉलमध्ये पत्रकार परिषदेची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल १००हून अधिक खुर्च्या पत्रकारांना बसण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मंत्री, खासदार आणि आमदारांना बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

तसंच शिवसेना भवनाबाहेर पदाधिकारी आणि सैनिकांची मोठी गर्दी होणार असल्यानं सेना भवनाबाहेर मोठा स्टेज उभारण्यात आला आहे. तसंच पत्रकार परिषद लाईव्ह पाहता यावी म्हणून एलईडी स्क्रीनही उभारण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेवेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवसेना भवन आणि आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेसाठी औरंगाबाद आणि नाशिकहून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. त्यानिमित्तानं शिवसेना भव्य शक्तीप्रदर्शन करणार असल्याचंही दिसून येत आहे.

संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन लोकं तुरुंगात असतील असं म्हटलं होतं. आज ते या नेत्यांची नावे जाहीर करणार आहेत. तसंच त्यांच्या संबंधातील पोलखोलही करणार आहेत. पण हे साडेतीन नेते महाराष्ट्रातील आहेत की केंद्रातील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.



हेही वाचा

महाराष्ट्रात दोन शिवजयंती नको, शिवसेना आमदारांची मागणी

राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदूहृदयसम्राट! चर्चा तर होणारच

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा