आदीवासी विकासमंत्र्यांवर घोटाळ्याचा आरोप

  Churchgate
  आदीवासी विकासमंत्र्यांवर घोटाळ्याचा आरोप
  मुंबई  -  

  सीएसटी - आदीवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी 16 कोटींचा स्वेटर घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केलाय. विष्णू सावरा यांनी विधानसभेत आदीवासींना स्वेटर देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र पंसतीचा कंत्राटदार न मिळाल्यानं त्यांनी त्यासाठी चारवेळा निविदा काढल्या. 4 वेळा निविदा काढूनही विष्णू सावरा यांनी खात्यात पैसे टाकण्याचा निर्णय का घेतला असा सवाल वाघमारे यांनी केला. आदीवासी लोक आणि मुलांची खाती कुठे आहेत याचा अद्याप ठावठिकाणा नाही. हिवाळा सुरू झाला तरी मुलांच्या खात्यात पैसे जमा केले नाही त्यामुळे मुले स्वेटर घेणार तरी कसे असा सवाल वाघमारे यांनी केलाय. त्याचबरोबर औषधांच्या लँबमध्ये रेनकोटची तपासणी करून रेनकोट खरेदीत १२ कोटींचा घोटाळा करण्यात आलाय. त्यामुळे या सर्व घोटाळ्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी वाघमारे यांनी मुंबई कॉंग्रेसच्यावतीनं केलीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.