मतदार याद्यांमध्ये घोळ नाही - जे. एस. सहारिया

Mumbai  -  

मुंबई -  महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडलंय. 2012 च्या तुलनेत यंदा मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं असलं तरी लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचंही समोर आलं. मतदार यादीतील घोळ आणि मतदान केंद्रातील बदल यामुळे लाखो मतदारांना मतदानाचा हक्कच बजावता आला नाही. मात्र ही नावे जाणूनबुजून गहाळ केलीत का? असा सवाल शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित करत नव्या वादाला तोंड फोडलंय.

दरम्यान 55 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदार याद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी केलाय. मतदार यादीतील घोळाला जबाबदार कोण? यापेक्षा मुंबईतील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिलेत हेही वास्तव नाकारता येणार नाही.

Loading Comments