प्रचार करू कुणाचा ?

  Dadar
  प्रचार करू कुणाचा ?
  मुंबई  -  

  दादर - संपूर्ण मुंबईचे लक्ष केंद्रीत असलेल्या दादर- माहिममधील प्रभाग 191 हा निवडणुकीआधीच चर्चेचा ठरलाय. शिवसेना, मनसे आणि भाजपासाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा आहे. आता यात काँग्रेसने चुरस निर्माण केली आहे. काँग्रेसने या प्रभागातून रोशना शाह यांना उमेदवारी दिलीय. रोशना या शिवसेना उपविभागप्रमुख अश्विन शाह यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे अश्विन शाह हे आपल्या बायकोचा प्रचार करणार की शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार हेच पाहायचं आहे.

  प्रभाग क्रमांक 191 मधून विद्यमान मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांची पत्नी स्वप्ना देशपांडे या मनसेकडून तर माजी महापौर विशाखा राऊत या शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मात्र, भाजपाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. तर काँग्रेसने या जागेवरून महिला जिल्हाध्यक्षा रोशना शाह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रोशना शाह या काँग्रेसमधून निवडणूक लढवत असल्या तरी त्यांचे पती अश्विन शाह हे दादर भागातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख आहेत. मागील निवडणुकीत अश्विन शाह यांनी प्रभाग 185 मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शाह यांनी 2 हजार 977 एवढी मते मिळाली होती. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी शाह यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी उपविभाग प्रमुख बनवण्यात आले. मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांना शिवसेनेत आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.

  "आपण शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार असून माझी बायको स्वतःचा प्रचार करण्यास समर्थ आहे," असे अश्विन शाह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकाच घरात मतांची विभागणी होऊन त्याची फोडाफोडी कशी होईल हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.