Advertisement

सुनील पाटील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक


सुनील पाटील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक
SHARES

विक्रोळी - वाॅर्ड क्रमांक 123 मधील शिवसेना उप शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. महानगरपालिकेचे मतदान संपल्यानंतर वाॅर्ड क्रमांक 123 मधील शिवसेना उप शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले होते, त्यांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी संध्याकाळी पाटील शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवलाय. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात किरण मोरे (29), प्रविण मोरे (27), संदेश दळवी (44) या तीन जणांना पकडले आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलीस अधिक तपास करत आहेत.

शिवसेनेतून बंडखोरी केलेले माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी त्यांच्या साथीदारांसोबत हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. मोरे हे 20 फेब्रुवारीच्या रात्री पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच रागातून मोरे यांच्या सहकाऱ्यांनी पाटील यांच्यावर हा हल्ला केल्याचं समजतं.

123 वाॅर्डमधून शिवसेनेच्या डाॅक्टर भारती बावदाने उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात सुधीर मोरेंनी त्यांच्या वहिनी स्नेहल मोरे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहत असलेल्या डाॅक्टर भारती बावदाने यांना सुधीर मोरे यांच्याकडून धमक्या आणि त्रास देणे सरू होते. या प्रकरणी बावदाने यांनी त्याच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

संबंधित विषय
Advertisement