प्रचारसभेत शिवसेनेवर मुख्यमंत्री बरसले

Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर - घाटकोपरमध्ये भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. शिवसेनेचा विकास झाला पण, पालिकेचा विकास झाला नाही. शिवसेना विकासकामांबद्दल बोलत नाही. सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून यांनी महापालिका चालवली, अशा अनेक मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. तसंच या निवडणुकीत मुंबईचा विकास करणाऱ्यांनाच निवडून द्या असं आवाहन या वेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं. भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपली संपत्ती जाहीर करण्याचं खुलं आव्हान दिलं. तसंच त्यांनी आपल्या तक्रारींची फाईल मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करणार असल्याचंही या वेळी स्पष्ट केलं. या सभेला आरपीआय नेते रामदास आठवले, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments