Advertisement

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ७ महत्वाचे निर्णय

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, मुला-मुलीचं वसतिगृह आणि इतर नवीन निवासी इमारती बांधण्यासाठी ९५.१५ कोटी रुपये बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ७ महत्वाचे निर्णय
SHARES

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, मुला-मुलीचं वसतिगृह आणि इतर नवीन निवासी इमारती बांधण्यासाठी ९५.१५ कोटी रुपये बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारनं विविध निर्णय घेतले.

महत्त्वाचे निर्णय

  • नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा (ता.जि.नागपूर) इथं विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी  (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
  • कोविड १९ पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
  • महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय. (कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग)
  • महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ मधील कलम- २ (g) (iv) आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची १ च्या अनुच्छेद २५ (da) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)
  • बाजार समित्या मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग)
  • शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा