Advertisement

शरद पवारांची सुरक्षा काढली, राष्ट्रवादीकडून नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ​शरद पवार​​​ (sharad pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था (security) केंद्र सरकारनं हटवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून (ncp) नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शरद पवारांची सुरक्षा काढली, राष्ट्रवादीकडून नाराजी
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था (security) केंद्र सरकारनं हटवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून (ncp) नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. पवारांसह आणखी ४० व्यक्तींची सुरक्षा हटवण्यात आल्याची माहितीही पुढं आली आहे.

दिल्लीतील 'सहा जनपथ' (6th janpath) इथं शरद पवार (sharad pawar) यांचं निवासस्थान आहे. तिथं दिल्ली पोलीस (delhi police) व सीआरपीएफचे (crpf) प्रत्येकी ३ जवान तैनात असायचे. परंतु २० जानेवारीपासून त्यांना हटवण्यात आलं आहे.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरणाची SIT कडून चौकशी व्हावी, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्र सरकारने राजकीय आकसातून शरद पवार (sharad pawar) यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. केंद्र सरकारचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नाही. भाजप सरकारच्या (bjp government) या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या मनात त्यांच्याबद्दलचा राग आणखी वाढेल. सुरक्षा व्यवस्था काढली म्हणून शरद पवार (sharad pawar) घराबाहेर पडणार नाहीत का? असा सवाल त्यांनी भाजपला उद्देशून केला.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून (home ministry) सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येते. संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता लक्षात त्याला कुठल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था द्यायची हे ठरवण्यात येते. त्यासाठी अतिमहत्त्वाच्या (vip) व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा वेळोवेळी घेण्यात येतो. त्यानुसार सुरक्षेत वाढ करायची की कपात करायची याची संबंधित व्यक्तीला पूर्वकल्पना दिली जाते. परंतु, शरद पवार (sharad pawar) यांना तसं कुठलंही कारण न देता त्यांची सुरक्षा काढल्याचं दिल्लीतील त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा- शिवसेनेसोबत सरकार स्थापन करा, अल्पसंख्याकांनीच सांगितलं- शरद पवार

याआधी केंद्र सरकारने गांधी कुटुंबातील (gandhi family) सदस्यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) (spg) सुरक्षा हटवली होती. पाठोपाठ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (former pm manmohan singh) यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसकडून भाजपचा जोरदार निषेध करण्यात आला होता. यावरून काँग्रेस- भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. त्यानंतर आता शरद पवार यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून भीमा-कोरेगाव (Bhima koregaon) प्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. या दोन पानी लिहिलेल्या पत्रात शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याचं कळतं. फडणवीस यांनी सत्तेचा चुकीचा वापर करत पत्रकारांना चुकीची माहिती दिल्याचं पवार यांचं म्हणणं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा