Advertisement

JNU Protest: असले प्रकार भाजपवाले करायचे, असं का म्हणाले पवार?

आंदोलनावरील कारवाईसंदर्भात वक्तव्य करताना शरद पवार म्हणाले की, ‘फ्री काश्मीर’चं पोस्टर झळकवणं याचा अर्थ काश्मीरला आझाद करण्याची मागणी करणं, असा होत नाही.

JNU Protest: असले प्रकार भाजपवाले करायचे, असं का म्हणाले पवार?
SHARES

गेट वे आॅफ इंडिया येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान ‘फ्री काश्मीर’चं पोस्टर झळकावणाऱ्या तरूणीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यावर भाष्य करताना असे प्रकार भाजप सरकारच्या काळात व्हायचे, आपल्या सरकारच्या काळात होता कामा नये, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना दिल्या. 

हेही वाचा- ‘फ्री काश्मिर पोस्टर’ झळकवल्या प्रकरणी चौकशी करू- अनिल देशमुख

नरिमन पाॅईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक घेतली. तब्बल ३ तास चाललेल्या या बैठकीत पवारांनी सरकारमध्ये काम करताना मंत्र्यांनी कुठली काळजी घ्यावी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये समन्वय कसा साधावा, पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद कसा ठेवावा आणि जनाधार वाढविण्यासाठी कुठले प्रयत्न करायला हवे, यासंदर्भात सूचना दिल्या. 

आंदोलनावरील कारवाईसंदर्भात वक्तव्य करताना शरद पवार म्हणाले की, ‘फ्री काश्मीर’चं पोस्टर झळकवणं याचा अर्थ काश्मीरला आझाद करण्याची मागणी करणं, असा होत नाही. त्यामुळे आधी व्यवस्थित माहिती घेऊनच कारवाई व्हायला हवी. दोन-चार अधिकाऱ्यांच्या माहितीवर अवलंबून राहून निर्णय घेऊ नका. असे प्रकार भाजप सरकारच्या काळात व्हायचे, आपल्या काळात असे प्रकार होता कामा नये. यामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. असे प्रकार टाळायला हवेत. या शब्दांत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही सल्ला दिला.

हेही वाचा- JNU Protest: महकवर नोंदवलेला गुन्हा दुर्दैवी- भुजबळ

   

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा